मुलांच्या सर्वांगिन विकासाठी दप्तरमुक्त अभियान राबविनारी शाळा.
लासलगाव
- लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित,आय.एस.ओ.9001:2015 मानांकित
जिजामाता प्राथमिक शाळा 100 टक्के सेमी इंग्रजी व डिजीटल क्लासरूमयुक्त
एकमेव खाजगी प्राथमिक शाळा म्हणून नावारूपाला आली आहे.संस्थेचे संस्थापक
लोकनेते कै.दत्ताजी भिकाजी पाटील यांनी स्थापन केलेली शाळा.त्यांचे
ब्रीदवाक्य होते - हाती घ्याल ते तडीस न्या! हेच आज संस्थेचे ब्रीदवाक्य
आहे.या वाक्याप्रमाणे संस्था व शाळेचा प्रवास पुढे सुरू आहे.या शाळेत
परिसरातील गरीब, कष्टकरी वर्गाचे, सर्वसामान्य पालकांचे 600 पेक्षा अधिक
मुले शिक्षण घेतात.जे पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत
आर्थिक परिस्थितीमुळे प्रवेश घेवु शकत नाही.अशा विद्यार्थ्यांसाठी
संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील,सचिव संजय पाटील यांनी शाळा 100% सेमी
इंग्रजी केली.सर्वच विद्यार्थ्यांना याचा फायदा होत आहे.इंग्रजी
माध्यमाच्या शाळेतुन दरवर्षी अनेक मुले या शाळेत प्रवेश घेत आहेत.ही नक्कीच
अभिमानास्पद बाब आहे.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र,आर.टी.ई.कायदा यामध्ये
विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होणे अपेक्षित आहे.तसेच विद्यार्थ्यांच्या
पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करणे गरजेचे व कायद्याने बंधनकारक आहे.यासाठी
प.स.सदस्य रंजनाताई पाटिल, संचालिका निताताई पाटील ,शंतनु पाटील शाळेच्या
मुख्यकार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील, मुख्याध्यापक अनिस काझी यांनी
प्रभावी अंमलबजावनी करत दोन वर्षापुर्वी राज्यात पथदर्शी ठरलेला उपक्रम
म्हनजे 'दप्तरमुक्त शनिवार' हा उपक्रम सुरु केला.2020 हे या उपक्रमाचे सलग
दुसरे वर्ष आहे.सेमी इंग्रजी सोबतच इंग्रजी विषयात विद्यार्थ्यांची रूची
वाढावी म्हनुन अभ्यासक्रमा व्यतिरिक्त विविध कृतियुक्त इंग्रजी बडबड गीते
म्हनुन घेतली जातात. सर्व मुलांच्या इंग्रजी कविता तोंडपाठ आहेत.शिक्षक
स्वता अध्यापनात कृतीचा पुरेपुर वापर करतात.त्यामुळे मुले देखील शिक्षकांचे
अनुकरण करतात.तसेच इंग्रजी वाचन व संभाषण प्रभावीपणे करता यावे यासाठी
यशस्वी प्रयत्न केले जातात.शाळेचे उपशिक्षक समीर देवडे यांनी लिहिलेल्या
माय स्पोकन इंग्लिश बुक या पुस्तकाचा देखील विद्यार्थी व शिक्षकांना
दैनंदिन अध्यापनात उपयोग होत आहे.बदलत्या तंत्रज्ञानानुसार इ - लर्निंगचा
अध्यापनामधे वापर होणे गरजेचे आहे.संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या डिजीटल
क्लासरूममुळे हे शक्य झाले.सर्वच शिक्षक दैनंदिन अध्यापनामध्ये विविध
शैक्षणिक व्हिडिओ व डिजिटल अभ्यासक्रमाचा प्रभावीपणे वापर करत आहेत.यामुळे
विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी लागुन मुले 100% उपस्थित राहु लागली
आहेत.पारंपारिक अध्यापनाबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अध्यापनात करतांना
शनिवारी विविध कार्यशाळा आयोजीत करुन विद्यार्थ्यांना गुगल प्ले
स्टोअरमधून विविध शैक्षणिक अॅप्सचा वापर प्रात्याक्षिकासह दाखविन्यात
येतो. उदा.पेपर मर्ज क्यूब अॅप,क्यु आर कोड स्कॅनर, हॅलो इंग्लिश,ए.बी.सी.
वर्डस,अॅनिमल फोरडी, ए.बी.सी गेम्स,युटबवरील विविध व्हिडिओ प्रोजेक्टरवर
पाहणे.याद्वारे दैनंदिन अध्यापनात सोशल मिडियाचा सकारात्मक वापर केल्याने
त्याचे प्रभावी परिणाम दिसुन आलेत.शाळेने एक वर्षापुर्वी स्वताचा यु-ट्युब
चॅनल निर्माण केलेला आहे..आज राज्य,देश नव्हे तर परदेशातील एक लाखाहुन
अधिक शिक्षकांनी शाळेच्या चॅनलवरील व्हिडिओ पाहिलेत. शाळेतील
विद्यार्थ्यांच्या इंग्रजी विषयाच्या कविता,कृतियुक्त गीते, भाषिक
खेळ,संभाषणे, विविध उपक्रम इत्यादींचे विडिओ ते यु-ट्यूब वर अपलोड
करतात.त्याचा फायदा राज्यातील शिक्षकांना दैनंदिन अध्यापनात होत असुन.सदरचा
यु- ट्युब चॅनल नक्कीच राज्यातील शिक्षकांसाठी मार्गदर्शक आहे.सोशल
मिडियाचा प्रभावी वापर करत शिक्षक शाळेत राबविलेले उपक्रम प्रसारित
करतात.शाळेने प्रत्येक इयत्तेच्या पालकांसाठी महिला व पुरूष असे स्वतंत्र
वाटसअप ग्रुप केलेले आहेत.त्याद्वारे सुचना, शाळेत राबिविलेले विविध उपक्रम
पालकांपर्यंत पोहचविले जातात.
विद्यार्थ्यांना
विज्ञान विषयाचे विविध प्रयोग दाखविण्यासाठी संस्थेच्या विद्यालयातील
प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र असलेल्या प्रयोगशाळेत नेवुन तज्ञ शिक्षकांच्या
मदतीने प्रयोग करून दाखविले जातात.यामध्ये विविध परिसर भेटीचे आयोजन करून
विद्यार्थ्यांना परिसरातील पिके,नदी,बंधारे, ऐत्याहासिक वास्तु,सर्व
धार्मिक प्रार्थनास्थळे यांची माहिती व ज्ञान मिळवून दिले जाते.हरित सेनेची
स्थापना करत वृक्षलागवड करून वृक्ष संवर्धन केले आहे.शाळेतील विद्यार्थी
सुटीनंतर घरी जाताना रोज बाटलीतील शिल्लक पानी झाडांना टाकतात.त्याद्वारे
पान्याचा सद्उपयोग व वृक्षसंवर्धन केले जाते.दरवर्षी पालक मेळावा,माता पालक
मेळावा, मा.विद्यार्थी मेळावा इत्यादींचे आयोजन केले जाते. कला,
कार्यानुभव विषय,आकाश कंदिल, राखी निर्मित्ती अशा विविध कार्यशाळांचे आयोजन
केले जाते.शाळेने नुकतेच युनिस्को क्लबचे सदस्यत्व प्राप्त केले
आहे.त्याद्वारे आयोजीत एशियन पिंकी फेस्टा आंतराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत
शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे.इयत्ता चौथीची विद्यार्थीनी शिफा समीर
पठाण हिच्या चित्राची निवड राष्ट्रीय स्तरावर झाली आहे.कॅमलिन प्रस्तुत
नवनित चित्रकला स्पर्धा देखील शाळेत यशस्वीपणे आयोजित केली जाते.दप्तरमुक्त
शनिवार उपक्रमा अंतर्गत योगाचार्य यांच्या मार्गदर्शनाने योगासने, सर्वांग
सुंदर कवायत, मुक्तहालचाली घेतल्या जातात. तसेच विविध सामाजिक उपक्रम
राबविले जातात.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी
घेण्यासाठी विविध डॉक्टरांची व्याख्याने,वैघकिय तपासणी,दंत व नेत्र तपासणी
शिबिरे आयोजीत केली जातात.तंबाखुमुक्त शाळा अभियानात तंबाखुमुक्त शाळेचा
मान मिळालेला आहे.पालकांना देखील तंबाखुमुक्त करन्यात शाळेचा सिंहाचा वाटा
आहे.लेक वाचवा, लेक शिकवा अभियान ,परिसरातील नामवंत विविध कवी व
लेखक,गायक,कलावंत,पोलीस,पत्रकार , डॉक्टर अशा विविध व्यावसायिक यांची भेट
घडवुन आणली जाते.त्यांच्या कार्याचे प्रात्याक्षिक दाखविले जाते.सैनिक व
पोलीसांसाठी रक्षाबंधन उपक्रम दरवर्षी राबविला जातो.श्यामची आई कथामाला
राबविली जाते. विविध शैक्षणिक चित्रपट मोठ्या चित्रपटगृहात संस्थेच्या
मदतीने मोफत दाखविले जातात.विविध थोरपुरूषांच्या जयंती, निमित्ताने वकृत्व
स्पर्धा आयोजीत करुन विद्यार्थ्यांना रोख पारितोषीक व शैक्षणिक साहित्य
बक्षिस दिले जातात. संस्था अंतर्गत आयोजीत केलेल्या
क्रिडास्पर्धां,विज्ञान प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, आनंद नगरी यात
शाळेचा सक्रिय सहभाग असतो. संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव संजय
पाटील व संचालक मंडळ वेळोवेळी शाळेला भेटी देऊन अडीअडचणी समजून घेतात
मुख्याध्यापक व शिक्षकांना मार्गदर्शन करतात. शाळेला नासिक विभागाचे
शिक्षण उपसंचालक , जिल्हा शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, या मान्यवरांनी
भेटी देऊन शालेय उपक्रमांचे कौतुक केले आहे. लासलगाव बिटाचे विस्तार
अधिकारी वसंत गायकवाड व पालकवर्ग यांचेही मार्गदर्शन मिळत असते.

No comments:
Post a Comment