मराठी राजभाषा दिन.
दि.27 फेब्रुवारी हा दिवस
सबंध जगभरात मराठी भाषिक मराठी दिन म्हनुन साजरा करतात.या दिवसालाच
अन्य नावे :मराठी भाषा दिवस,मराठी राजभाषा दिन ,मराठी
गौरव दिन असे संबोधले जाते.ज्ञानपीठ
पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी कवी
विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज)
यांचा जन्मदिवस हा 'मराठी भाषा गौरव
दिन'
म्हणून साजरा केला जातो.भारतीय ज्ञानपिठ
न्यासाकडुन १९८७ साली त्यांना
मराठी वाडमयातील योगदाना बद्दल ज्ञानपीठ
पुरस्कार बहाल केला.ज्ञानपीठ
पुरस्कार भारतीय ज्ञानपीठ न्यासाद्वारे
भारतीय साहित्यासाठी दिलेला
सर्वोच्च पुरस्कार आहे.या पुरस्कारमध्ये
रोख रक्कम,प्रशस्तिपत्र आणि
वाग्देवीची कांस्य
प्रतिमा भेट दिली जाते.भारतातुन मराठी साहित्याला पहिला ज्ञानपिठ पुरस्कार
इ.स.1974 मध्ये लेखक विष्णु सखाराम खांडेकर यांना ययाती या कांदबरीसाठी देन्यात आला.त्यांनतर कवीवर्य विष्णु वामन
शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांना नटसम्राट या नाट्यासाठी देन्यात आला.नंतर
इ.स.2003 मध्ये विं.दा.करंदिकर यांना देन्यात आला.अलिकडे इ.स.2014 मध्ये
लेखक भालचंद्र वनाजी नेमाडे यांना हा पुरस्कार देन्यात आला.त्यानंतर
शासनाने कुसुमाग्रजांचा जन्मदिन हा दिवस मराठी गौरव
दिन म्हणून जाहीर केला.
वि.वा.शिरवाडकर यांना लहानपणापासून लिहण्याची आवड होती.त्यांनी बालपनी कविता
लिहण्यास सुरूवात केली.पुढे कथा,कादंबरी,नाटक, ललित वाड्यमयातील नावाजलेलेली साहित्य रचना त्यांच्या
लिखानातून अवतरत राहिली.त्यांच्या अनोख्या साहित्यासाठी १९७४ साली नटसम्राट
या नाटकासाठी ‘साहित्य अकादमीचा पुरस्कार’
मिळाला.भारत सरकारने १९९१ मध्ये
त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरविन्यात आले आहे.असे अनेकविध पुरस्कार
त्यांच्या साहित्याला प्राप्त झाले आहे.त्यांचे स्मारक आपल्या नासिकमध्ये आहे.वाडमयाचा
प्रचार व प्रसार वेगवेगळ्या माध्यमातुन
व्हावा या उदात्त हेतुने त्यांनी आपले
लिखान केले आहे.त्यात नाट्यलेखन,कविता,गीते,कांदबरी,कथा यांचा समावेश आहे.
मराठी भाषा संवर्धनासाठी अनेकविध उपयायोजना शासनाकडुन राबविल्या
जातात.परंतु मराठी भाषिक,मराठी माध्यमाच्या शाळेतील शिक्षक या नात्याने भारत देशात मराठी विषय व मराठी माध्यमांच्या शाळेत शिकविन्याचे,ज्ञानदानाचे कार्य करनार्या प्रत्येक शिक्षकाचे हे आद्य कर्तव्य आहे.आपण मराठी
भाषा संवर्धनासाठी तन,मन,धनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.यासाठी अनेक विविध उपक्रम आपण प्राथमिक ते महाविद्यालयीन स्तरावर
राबवु शकतो.उदा.दैनंदिन पाठ्यक्रमा व्यतिरिक्त
विविध प्रकारचे मराठी नाटके मुलांकडुन
करून घेणे.वेगवेगळ्या नाट्य स्पर्धांमद्ये शालेय विद्यार्थ्यांचा
सहभाग वाढविणे.शालेय स्तरावर अथवा तालुका,जिल्हा स्तरावर अशा
स्पर्धांचे आयोजन करणे.उदा.जिल्हा विज्ञान अध्यापक संघाच्यावतीने दरवर्षी
विज्ञान नाट्य स्पर्धा आयोजीत केल्या जातात.यात प्रत्येक शाळेने
सहभागी होने गरजेचे आहे.विविध शैक्षणिक,
धार्मिक
चित्रपट मुलांना दाखविणे.शास्त्रीय
संगीत ऐकविणे,तशा प्रकारच्या संधी मुलांना उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.शाळा स्तरावर विद्यार्थी - शिक्षक काव्य संमेलन आयोजीत करण.औरंगाबाद
येथुन दरमहा प्रकाशित होणारे शासनमान्य जीवन गौरव मासिक दरवर्षी
अशाप्रकारचे राज्यस्तरीय साहित्य संमेलन व काव्य संमेलन आयोजीत करत
आहे.संपादक रामदास वाघमारे सर,सह संपादक शिक्षिका वैशाली भामरे, रूपाली कराड यांचे
यात फार मोठे योगदान आहे.या मासिकात शिक्षक विद्यार्थ्यांच्या मराठीतील
कविता, लेख प्रकाशित केले जातात.अशा प्रकारच्या अनेक संस्था कार्यरत
आहे.त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवुन देणे शिक्षकांचे कर्तव्य आहे.निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा आणि मराठी भाषेला उत्तम दिशा देण्याचे
अनेकविध कार्यक्रम आपण आयोजित करू शकतो.लासलगावचा मराठी भाषा संवर्धन व
विकासाचा थोडक्यात आढावा घेणे यानिमित्ताने औचित्याचे ठरेल.वनस्थळी
(कलांजली) संस्था शास्त्री नगर, लासलगाव यांचे तर्फे दरवर्षी राजभाषा दिनाच्या औचित्याने कवी संमेलन आयोजीत करन्यात येते.यावर्षी देखील जेष्ठ साहितीक
मराठीचे प्राध्यापक शिरीष गंधे यांचे अध्यक्षतेखाली काव्य संमेलन संपन्न होत आहे.ज्यात अनेक शिक्षक व विद्यार्थी आपल्या कविता सादर करनार
आहे.अशा प्रकारचे उपक्रम आपण शाळा स्तरावर देखील राबवु शकतो.लासलगाव
मराठी साहित्य परिषद नेहमी नवोदित लेखक व कवी यांना मार्गदर्शन करून नविन
लिखानासाठी शुभेच्छा देत असते.लासलगाव येथील रहिवाशी महाराष्ट्रातील ख्यातन्याम कवी,गीतकार प्रकाश होळकर यांचे मराठी साहित्य क्षेत्रात
मोठे योगदान आहे.अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले आहे.त्यांचे अनेक
कवीता संग्रह प्रकाशित झाले आहेत.दुरदर्शनवर देखील अनेक कार्यक्रम
प्रसारित झाले आहेत. इतिहास अभ्यासक संजय बिरार यांचे लेखन अतिशय उत्कृष्ट
आहे. त्यांचे नविन पुस्तक लासलगावची बखर प्रकाशनाच्या वाटेवर आहे.अनेक लेख व
परमपूज्य भगरी बाबांवर त्यांनी माहिती संकलित केली आहे. तसेच प्रा.किशोर
गोसावी यांनी देखील लासलगावचे आराध्यदैवत परमपूज्य भगरी बाबा
दिव्यदर्शन या पुस्तकाचे लेखन केलेल आहे.
नवोदित लेखक शिवाजी विसपुते यांच्या विधिलिखीत या कादंबरीने देखील अनेक पुरस्कार
मिळविले आहेत. नुकताच त्यांच्या या कादंबरीला समृद्धी प्रकाशन संस्था
हिंगोलीच्या वतीने दिला जाणारा 'राज्यस्तरीय संत नामदेव कादंबरी साहित्य पुरस्कार 2019' मिळाला
आहे.झी युवा सिंगर एक नंबर फेम गायक विंचुर येथील
जगदिश चव्हाण हा लासलगाव शिक्षण सहायक
मंडळ संचलित लोकनेते दत्ताजी पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा
विद्यार्थी आहे.संगीत व गीत गायनात सुवर्णा क्षिरसागर यांनी अनेक
विद्यार्थी घडविले आहेत.नुकताच त्यांचा डिडी सह्याद्री या शासकीय वाहिनीवर
संगिताचा कार्यक्रम प्रसारित झाला आहे.मराठी संगीत क्षेत्रात ग्रामिण
भागात त्यांचे मोठे योगदान आहे.संगितकार बाबासाहेब चव्हाणके यांचे
विद्यार्थी देखील मराठी गीतगायनात राष्ट्रिय स्तरावर चमकले आहेत.महेंद्र फुलपगार, तुषार देवरे असे अनेक
नामवंत कलाकार ग्रामिण शहरी
भागात मराठी भाषा,मराठी संगीत,गीतगायन यात आपले
योगदान देत आहे.ते नक्कीच
प्रेरणादाई आहे.अरुण भांबारे यांचे
इतिहासा वरील लेख वाचनीय व माहितीपुर्न
असतात.त्यांची लेखन शैली अतिशय प्रभावी
आहे.कवी राजेंद्र होळकर यांचे
देखील साहित्य क्षेत्रात व मराठी भाषा
संवर्धनासाठी खुप मोठे योगदान
आहे.लासलगाव समाचार या फेसबुक ग्रुपच्या
माध्यमातुन ते नवोदित लेखक, कवी यांचे लेख व कविता यांना नेहमीच प्रसिद्धी देत असतात.शेतीतज्ञ
सचिन होळकर यांचे शेतीविषयक मार्गदर्शनपर लेख अनेक वृत्तपत्रे व मासिके
यात प्रकाशित झाले आहे.पत्रकार रामभाऊ आवारे,समीर पठाण,निलेश देसाई व अन्य सर्वच पत्रकार यांचे अनेक विषाावरील
नाविन्यपुर्न लेख प्रकाशित झालेले आहेत.
ऋषीकेश जोशी गुरू यांचे आपले
सण आपले उत्सव व इतिहासपर लेख माहितीपुर्न व मार्गदर्शन करनारे
असतात.ब्राम्हण समाजाच्या राज्य कार्याध्यक्षा स्मिता कुलकर्णी यांचे
स्त्री सक्षमीकरणावरील लेख मार्गदर्शक असतात.कवी शिक्षक कैलास भामरे,नुमान शेख,गुरुदेव गांगुर्डे
यांच्या कविता महाराष्ट्र राज्य
साहित्य संमेलनात सादर झालेल्या
आहेत.त्यांचे मार्गदर्शनाने अनेक
विद्यार्थी कविता लेखन करत आहे.अशा
प्रकारे लासलगाव परिसरातील विविध
व्यक्तींचे मराठी भाषा संवर्धनासाठी
अतोनात प्रयत्न सुरू आहेत.मराठी
राजभाषा दिनाच्या आपण सर्व वाचकांना
हार्दिक शुभेच्छा.लेखन व वाचन
संस्कृती जोपासण्यासाठी कटिबद्घ राहुया.
समीर देवडे
उपशिक्षक जिजामाता
प्राथमिक शाळा,लासलगाव
No comments:
Post a Comment