मुलांच्या विकासासाठी कार्यरत असलेला उपक्रमशिल शिक्षक ..समीर देवडे
लासलगाव
- लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित,आय.एस.ओ.9001:2015 मानांकित
जिजामाता प्राथमिक शाळा 100 टक्के सेमी इंग्रजी व डिजीटल क्लासरूमयुक्त
एकमेव खाजगी प्राथमिक शाळा म्हणून नावारूपाला आली आहे.संस्थेचे संस्थापक
लोकनेते कै.दत्ताजी भिकाजी पाटील यांनी स्थापन केलेली शाळा.त्यांचे
ब्रीदवाक्य होते - हाती घ्याल ते तडीस न्या! हेच आज संस्थेचे ब्रीदवाक्य
आहे.या वाक्याप्रमाणे संस्था व शाळेचा प्रवास पुढे सुरू आहे.या शाळेचे
उपक्रमशिल उपशिक्षक समीर देवडे यांचा प्रेरणादाई शैक्षणिक प्रवास - सन 1997
मध्ये इंग्रजी माध्यमातुन डी.एड. ची पदवी प्राप्त करून त्याच वर्षी या
शाळेत शैक्षणिक सेवेला सुरूवात केली.आपल्या इंग्रजी विषयाच्या ज्ञानाचा
वापर शिक्षकांबरोबरच आपल्या शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना देन्यास सुरूवात
केली.विविध कृतियुक्त इंग्रजी बडबड गीते असतिल किंवा इंग्रजी कविता सर्वच
यांचे तोंडपाठ आहेत.त्यामुळे मुले देखील शिक्षकांचे अनुकरण करू
लागले.जिजामाता शाळा तस म्हटल तर शहरी भागातली पन विद्यार्थी संख्या मात्र
तळागाळातली व ग्रामिण भागातील जास्तच आहे. या विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचन
व संभाषण करन्यात यशस्वी प्रयत्न केले. बदलत्या तंत्रज्ञानानुसार इ -
लर्निंगचा अध्यापनामधे वापर होणे गरजेचे आहे.संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या
डिजीटल क्लासरूममुळे हे शक्य झाले.स्वता दैनंदिन अध्यापनामध्ये विविध
शैक्षणिक व्हिडिओ व डिजिटल अभ्यासक्रमाचा प्रभावीपणे वापर करत आहेत.यामुळे
विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी लागुन मुले 100% उपस्थित राहु लागली
आहेत.विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाचे विविध प्रयोग दाखविण्यासाठी
संस्थेच्या विद्यालयातील प्रयोगशाळेत घेवुन जातात.परिसर भेटीचे आयोजन करून
विद्यार्थ्यांना परिसराचे ज्ञान मिळवून दिले जाते.हरित सेनेची स्थापना करत
वृक्षलागवड करून वृक्ष संवर्धन केले आहे.त्याचे रूपांतर आज बहारदार
वृक्षांत झाले आहे.दरवर्षी पालक मेळावा,माता पालक मेळावा, मा.विद्यार्थी
मेळावा इत्यादींचे आयोजन केले जाते. कला, कार्यानुभव विषय,आकाश कंदिल, राखी
निर्मित्ती अशा विविध कार्यशाळांचे आयोजन,कॅमलिन प्रस्तुत नवनित चित्रकला
स्पर्धा यशस्वीपणे आयोजित केली जाते.योगासने, सर्वांग सुंदर कवायत,
मुक्तहालचाली व विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.मागील पाच वर्षापासुन
ते स्पोकन इंग्लिश व ब्रिटिश कौन्सिलचे राज्य मार्गदर्शक म्हणुन काम करत
आहे.त्यांनी माय स्पोकन इंग्लिश बूक हे पुस्तक लिहले असून त्याच्या दोन
आवृत्ती प्रकाशित झाल्या आहेत.त्यासाठी राज्याच्या शिक्षण मंत्र्यांचे
अभिनंदन पत्र प्राप्त झाले आहे.शिक्षण विभाग व ब्रिटिश कौन्सिल मार्फत
त्यांची दोन वेळा इंग्रजी विषयाच्या आंतरराष्ट्रीय परिषदांसाठी निवड झाली
अाहे.विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध डॉक्टरांची
व्याख्याने,लेक वाचवा, लेक शिकवा अभियान ,परिसरातील विविध कवी व लेखक यांची
भेट घडवुन आणली जाते.श्यामची आई कथामाला वर्गात राबविली जाते.संस्थेने
आयोजीत केलेल्या क्रिडास्पर्धां,विज्ञान प्रदर्शन, मोफत आरोग्य तपासणी
शिबिर,सांस्कृतिक कार्यक्रम, आनंद नगरी ,दप्तरमुक्त शनिवार इत्यादी उपक्रम
राबविले जातात.ऑगष्ट 2019 मध्ये
महाराट्र शासन व
ब्रिटिश कौन्सिलच्या तेजस प्रकल्पातील कथा परिवर्तनाच्या पुस्तकात समीर
देवडे यांची इंग्रजी विषयाची यशोगाथा प्रकाशीत करन्यात आलीय. उत्कृष्ट
प्रशिक्षक म्हनुन त्यांचा गौरव करन्यात आलाय.गुगल प्ले स्टोअरमधून वर्ग
अध्यापनात वेगवेगळ्या शैक्षणिक अॅप्सचा वापर ते करतात.उदा.पेपर मर्ज
क्यूब अॅप,क्यु आर कोड स्कॅनर, हॅलो इंग्लिश,सी वर्डस,अॅनिमल फोरडी,
ए.बी.सी गेम्स. स्वताच्या ब्लॉगवर वर्गातील विविध शैक्षणिक उपक्रमांची
माहिती ते लिहितात.
दैनंदिन अध्यापनात सोशल मिडियाचा
सकारात्मक वापर केल्यास त्याचे प्रभावी परिणाम दिसुन येतात.एक वर्षापुर्वी
स्वताचा यु-ट्युब चॅनल निर्माण करून.आज राज्य,देश नव्हे तर परदेशातील एक
लाखाहुन अधिक शिक्षकांनी त्यांच्या चॅनलवरील विडिओ पाहिलेत. शाळेतील
विद्यार्थ्यांच्या इंग्रजी विषयाच्या कविता,कृतियुक्त गीते, भाषिक
खेळ,संभाषणे, विविध उपक्रम इत्यादींचे विडिओ ते यु-ट्यूब वर अपलोड
करतात.त्याचा फायदा राज्यातील शिक्षकांना दैनंदिन अध्यापनात होत असुन.सदरचा
यु- ट्युब चॅनल नक्कीच राज्यातील शिक्षकांसाठी मार्गदर्शक आहे.
करील
मनोरंजन जो मुलांचे ,जडेल नाते प्रभुशी तयाचे या साने गुरूजींच्या
सुविचाराने प्रेरीत होवुन ग्रामिण भागातील मुलांना आनंददायी शिक्षण
देन्यासाठी त्यांची धडपड सुरू असते.संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी
अभिनंदन पत्र देवुन कार्याचा गौरव केला आहे.तसेच आजवर विविध संस्थाचे
राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.