Monday, 24 February 2020

मुलांच्या सर्वांगिन विकासाठी दप्तरमुक्त अभियान राबविनारी शाळा.

मुलांच्या सर्वांगिन विकासाठी दप्तरमुक्त अभियान राबविनारी शाळा.

लासलगाव - लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित,आय.एस.ओ.9001:2015 मानांकित जिजामाता प्राथमिक शाळा 100 टक्के सेमी इंग्रजी व डिजीटल क्लासरूमयुक्त एकमेव खाजगी प्राथमिक शाळा म्हणून नावारूपाला आली आहे.संस्थेचे संस्थापक लोकनेते कै.दत्ताजी भिकाजी पाटील यांनी स्थापन केलेली शाळा.त्यांचे ब्रीदवाक्य होते -  हाती घ्याल ते तडीस न्या! हेच आज संस्थेचे ब्रीदवाक्य आहे.या वाक्याप्रमाणे संस्था व शाळेचा प्रवास पुढे सुरू आहे.या शाळेत परिसरातील गरीब, कष्टकरी वर्गाचे, सर्वसामान्य पालकांचे 600 पेक्षा अधिक मुले शिक्षण घेतात.जे पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आर्थिक परिस्थितीमुळे प्रवेश घेवु  शकत नाही.अशा विद्यार्थ्यांसाठी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील,सचिव संजय पाटील यांनी  शाळा 100% सेमी इंग्रजी केली.सर्वच विद्यार्थ्यांना याचा फायदा होत आहे.इंग्रजी माध्यमाच्या शाळेतुन दरवर्षी अनेक मुले या शाळेत प्रवेश घेत आहेत.ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र,आर.टी.ई.कायदा यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होणे अपेक्षित आहे.तसेच विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करणे गरजेचे व कायद्याने बंधनकारक आहे.यासाठी प.स.सदस्य रंजनाताई पाटिल, संचालिका निताताई पाटील ,शंतनु पाटील शाळेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील, मुख्याध्यापक अनिस काझी यांनी प्रभावी अंमलबजावनी करत दोन वर्षापुर्वी राज्यात पथदर्शी ठरलेला उपक्रम म्हनजे 'दप्तरमुक्त शनिवार' हा उपक्रम सुरु केला.2020 हे या उपक्रमाचे सलग दुसरे वर्ष आहे.सेमी इंग्रजी सोबतच इंग्रजी विषयात विद्यार्थ्यांची रूची वाढावी म्हनुन अभ्यासक्रमा व्यतिरिक्त विविध कृतियुक्त इंग्रजी बडबड गीते म्हनुन घेतली जातात. सर्व मुलांच्या  इंग्रजी कविता  तोंडपाठ आहेत.शिक्षक स्वता अध्यापनात कृतीचा पुरेपुर वापर करतात.त्यामुळे मुले देखील शिक्षकांचे अनुकरण करतात.तसेच इंग्रजी वाचन व संभाषण प्रभावीपणे करता यावे यासाठी यशस्वी प्रयत्न केले जातात.शाळेचे उपशिक्षक समीर देवडे यांनी लिहिलेल्या माय स्पोकन इंग्लिश बुक या पुस्तकाचा देखील विद्यार्थी व शिक्षकांना दैनंदिन अध्यापनात उपयोग होत आहे.बदलत्या तंत्रज्ञानानुसार  इ - लर्निंगचा अध्यापनामधे वापर होणे गरजेचे आहे.संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या डिजीटल क्लासरूममुळे हे शक्य झाले.सर्वच शिक्षक दैनंदिन  अध्यापनामध्ये विविध शैक्षणिक व्हिडिओ व डिजिटल अभ्यासक्रमाचा प्रभावीपणे वापर करत आहेत.यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी लागुन मुले 100% उपस्थित राहु लागली आहेत.पारंपारिक अध्यापनाबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अध्यापनात करतांना शनिवारी विविध कार्यशाळा आयोजीत करुन विद्यार्थ्यांना गुगल प्ले स्टोअरमधून विविध शैक्षणिक अ‍ॅप्सचा  वापर प्रात्याक्षिकासह दाखविन्यात येतो. उदा.पेपर मर्ज  क्यूब अॅप,क्यु आर कोड स्कॅनर, हॅलो इंग्लिश,ए.बी.सी. वर्डस,अॅनिमल फोरडी, ए.बी.सी गेम्स,युटबवरील विविध व्हिडिओ प्रोजेक्टरवर पाहणे.याद्वारे दैनंदिन अध्यापनात सोशल मिडियाचा सकारात्मक वापर केल्याने त्याचे प्रभावी परिणाम दिसुन आलेत.शाळेने एक  वर्षापुर्वी स्वताचा यु-ट्युब चॅनल निर्माण केलेला आहे..आज राज्य,देश नव्हे तर परदेशातील एक लाखाहुन अधिक शिक्षकांनी शाळेच्या चॅनलवरील व्हिडिओ पाहिलेत. शाळेतील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी विषयाच्या कविता,कृतियुक्त गीते, भाषिक खेळ,संभाषणे, विविध उपक्रम   इत्यादींचे विडिओ  ते यु-ट्यूब वर अपलोड करतात.त्याचा फायदा राज्यातील शिक्षकांना दैनंदिन अध्यापनात होत असुन.सदरचा यु- ट्युब चॅनल नक्कीच राज्यातील शिक्षकांसाठी मार्गदर्शक आहे.सोशल मिडियाचा प्रभावी वापर करत शिक्षक शाळेत राबविलेले उपक्रम प्रसारित करतात.शाळेने प्रत्येक इयत्तेच्या पालकांसाठी महिला व पुरूष असे स्वतंत्र वाटसअप ग्रुप केलेले आहेत.त्याद्वारे सुचना, शाळेत राबिविलेले विविध उपक्रम पालकांपर्यंत पोहचविले जातात.
विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाचे विविध प्रयोग दाखविण्यासाठी संस्थेच्या विद्यालयातील  प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र असलेल्या प्रयोगशाळेत नेवुन तज्ञ शिक्षकांच्या मदतीने प्रयोग करून दाखविले जातात.यामध्ये विविध परिसर भेटीचे आयोजन करून विद्यार्थ्यांना परिसरातील पिके,नदी,बंधारे, ऐत्याहासिक वास्तु,सर्व धार्मिक प्रार्थनास्थळे यांची माहिती व ज्ञान मिळवून दिले जाते.हरित सेनेची स्थापना करत वृक्षलागवड करून वृक्ष संवर्धन केले आहे.शाळेतील विद्यार्थी सुटीनंतर घरी जाताना रोज बाटलीतील शिल्लक पानी झाडांना टाकतात.त्याद्वारे पान्याचा सद्उपयोग व वृक्षसंवर्धन केले जाते.दरवर्षी पालक मेळावा,माता पालक मेळावा, मा.विद्यार्थी मेळावा इत्यादींचे आयोजन केले जाते. कला, कार्यानुभव विषय,आकाश कंदिल, राखी निर्मित्ती अशा विविध कार्यशाळांचे आयोजन केले जाते.शाळेने नुकतेच युनिस्को क्लबचे सदस्यत्व प्राप्त केले आहे.त्याद्वारे आयोजीत एशियन पिंकी फेस्टा आंतराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे.इयत्ता चौथीची विद्यार्थीनी शिफा समीर पठाण हिच्या चित्राची निवड राष्ट्रीय स्तरावर झाली आहे.कॅमलिन प्रस्तुत नवनित चित्रकला स्पर्धा देखील शाळेत यशस्वीपणे आयोजित केली जाते.दप्तरमुक्त शनिवार उपक्रमा अंतर्गत योगाचार्य यांच्या मार्गदर्शनाने योगासने, सर्वांग सुंदर कवायत, मुक्तहालचाली घेतल्या जातात. तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध डॉक्टरांची व्याख्याने,वैघकिय तपासणी,दंत व नेत्र तपासणी शिबिरे आयोजीत केली जातात.तंबाखुमुक्त शाळा अभियानात तंबाखुमुक्त शाळेचा मान मिळालेला आहे.पालकांना देखील तंबाखुमुक्त करन्यात शाळेचा सिंहाचा वाटा आहे.लेक वाचवा, लेक शिकवा अभियान ,परिसरातील नामवंत विविध कवी व लेखक,गायक,कलावंत,पोलीस,पत्रकार , डॉक्टर  अशा विविध व्यावसायिक यांची भेट घडवुन आणली जाते.त्यांच्या कार्याचे प्रात्याक्षिक दाखविले जाते.सैनिक व पोलीसांसाठी रक्षाबंधन उपक्रम दरवर्षी राबविला जातो.श्यामची आई कथामाला  राबविली जाते. विविध शैक्षणिक चित्रपट मोठ्या चित्रपटगृहात संस्थेच्या मदतीने मोफत दाखविले जातात.विविध थोरपुरूषांच्या जयंती, निमित्ताने वकृत्व स्पर्धा आयोजीत करुन विद्यार्थ्यांना रोख पारितोषीक व शैक्षणिक साहित्य बक्षिस  दिले जातात. संस्था अंतर्गत आयोजीत केलेल्या क्रिडास्पर्धां,विज्ञान प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, आनंद नगरी  यात शाळेचा सक्रिय सहभाग असतो. संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव संजय पाटील व संचालक मंडळ वेळोवेळी शाळेला भेटी देऊन अडीअडचणी समजून घेतात मुख्याध्यापक व शिक्षकांना मार्गदर्शन करतात. शाळेला नासिक विभागाचे  शिक्षण उपसंचालक , जिल्हा शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, या मान्यवरांनी भेटी देऊन शालेय उपक्रमांचे कौतुक केले आहे. लासलगाव बिटाचे विस्तार अधिकारी वसंत गायकवाड व पालकवर्ग यांचेही मार्गदर्शन मिळत असते.

मराठी राजभाषा दिन.

मराठी राजभाषा दिन.

दि.27 फेब्रुवारी हा दिवस सबंध जगभरात मराठी भाषिक मराठी दिन म्हनुन साजरा करतात.या दिवसालाच अन्य नावे :मराठी भाषा दिवस,मराठी राजभाषा दिन ,मराठी गौरव दिन असे संबोधले जाते.ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस हा 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो.भारतीय ज्ञानपिठ न्यासाकडुन १९८७ साली त्यांना मराठी वाडमयातील योगदाना बद्दल ज्ञानपीठ पुरस्कार बहाल केला.ज्ञानपीठ पुरस्कार भारतीय ज्ञानपीठ न्यासाद्वारे भारतीय साहित्यासाठी दिलेला सर्वोच्च पुरस्कार आहे.या पुरस्कारमध्ये रोख रक्कम,प्रशस्तिपत्र आणि वाग्देवीची  कांस्य प्रतिमा भेट दिली जाते.भारतातुन मराठी साहित्याला पहिला ज्ञानपिठ पुरस्कार इ.स.1974 मध्ये लेखक विष्णु सखाराम खांडेकर यांना ययाती या कांदबरीसाठी देन्यात आला.त्यांनतर कवीवर्य विष्णु वामन शिरवाडकर  (कुसुमाग्रज) यांना नटसम्राट या नाट्यासाठी देन्यात आला.नंतर इ.स.2003 मध्ये विं.दा.करंदिकर यांना देन्यात आला.अलिकडे इ.स.2014 मध्ये लेखक भालचंद्र वनाजी नेमाडे यांना हा पुरस्कार देन्यात आला.त्यानंतर शासनाने कुसुमाग्रजांचा जन्मदिन हा दिवस मराठी  गौरव दिन म्हणून जाहीर केला.
वि.वा.शिरवाडकर यांना लहानपणापासून लिहण्याची आवड होती.त्यांनी बालपनी कविता लिहण्यास सुरूवात केली.पुढे कथा,कादंबरी,नाटक, ललित वाड्यमयातील नावाजलेलेली साहित्य रचना त्यांच्या लिखानातून अवतरत राहिली.त्यांच्या अनोख्या साहित्यासाठी १९७४ साली नटसम्राट या नाटकासाठी ‘साहित्य अकादमीचा पुरस्कार’ मिळाला.भारत सरकारने १९९१ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरविन्यात आले आहे.असे अनेकविध पुरस्कार त्यांच्या साहित्याला प्राप्त झाले आहे.त्यांचे स्मारक आपल्या नासिकमध्ये आहे.वाडमयाचा प्रचार व प्रसार वेगवेगळ्या माध्यमातुन व्हावा या उदात्त हेतुने त्यांनी आपले लिखान केले आहे.त्यात नाट्यलेखन,कविता,गीते,कांदबरी,कथा यांचा समावेश आहे.
मराठी भाषा संवर्धनासाठी अनेकविध उपयायोजना शासनाकडुन राबविल्या जातात.परंतु मराठी भाषिक,मराठी माध्यमाच्या शाळेतील शिक्षक या नात्याने भारत देशात मराठी विषय व मराठी माध्यमांच्या शाळेत  शिकविन्याचे,ज्ञानदानाचे कार्य करनार्या प्रत्येक शिक्षकाचे हे आद्य कर्तव्य आहे.आपण मराठी भाषा संवर्धनासाठी तन,मन,धनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.यासाठी अनेक विविध उपक्रम आपण प्राथमिक ते महाविद्यालयीन  स्तरावर राबवु शकतो.उदा.दैनंदिन पाठ्यक्रमा व्यतिरिक्त  विविध प्रकारचे मराठी नाटके मुलांकडुन करून घेणे.वेगवेगळ्या नाट्य स्पर्धांमद्ये शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे.शालेय स्तरावर अथवा तालुका,जिल्हा स्तरावर  अशा स्पर्धांचे आयोजन करणे.उदा.जिल्हा विज्ञान अध्यापक संघाच्यावतीने दरवर्षी विज्ञान नाट्य स्पर्धा आयोजीत केल्या जातात.यात प्रत्येक  शाळेने सहभागी होने गरजेचे आहे.विविध शैक्षणिक, धार्मिक  चित्रपट मुलांना दाखविणे.शास्त्रीय संगीत ऐकविणे,तशा प्रकारच्या संधी मुलांना उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.शाळा स्तरावर विद्यार्थी - शिक्षक काव्य संमेलन आयोजीत करण.औरंगाबाद येथुन दरमहा प्रकाशित होणारे शासनमान्य जीवन गौरव मासिक दरवर्षी अशाप्रकारचे राज्यस्तरीय साहित्य संमेलन व काव्य संमेलन आयोजीत करत आहे.संपादक रामदास वाघमारे सर,सह संपादक शिक्षिका वैशाली भामरे, रूपाली कराड यांचे यात फार मोठे योगदान आहे.या मासिकात शिक्षक विद्यार्थ्यांच्या मराठीतील कविता, लेख  प्रकाशित केले जातात.अशा प्रकारच्या अनेक संस्था कार्यरत आहे.त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवुन देणे शिक्षकांचे कर्तव्य आहे.निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा आणि मराठी भाषेला उत्तम दिशा देण्याचे अनेकविध  कार्यक्रम आपण आयोजित करू शकतो.लासलगावचा मराठी भाषा संवर्धन व विकासाचा थोडक्यात आढावा घेणे यानिमित्ताने औचित्याचे ठरेल.वनस्थळी (कलांजली) संस्था शास्त्री नगर, लासलगाव यांचे तर्फे दरवर्षी राजभाषा दिनाच्या औचित्याने कवी संमेलन आयोजीत करन्यात येते.यावर्षी देखील जेष्ठ साहितीक मराठीचे प्राध्यापक  शिरीष गंधे यांचे अध्यक्षतेखाली काव्य संमेलन संपन्न होत आहे.ज्यात अनेक शिक्षक व विद्यार्थी आपल्या कविता सादर करनार आहे.अशा प्रकारचे उपक्रम आपण शाळा स्तरावर देखील राबवु शकतो.लासलगाव मराठी साहित्य परिषद नेहमी नवोदित लेखक व कवी यांना मार्गदर्शन करून नविन लिखानासाठी शुभेच्छा देत असते.लासलगाव येथील रहिवाशी महाराष्ट्रातील  ख्यातन्याम कवी,गीतकार प्रकाश होळकर यांचे मराठी साहित्य  क्षेत्रात मोठे योगदान आहे.अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले आहे.त्यांचे अनेक कवीता संग्रह प्रकाशित झाले आहेत.दुरदर्शनवर देखील अनेक कार्यक्रम प्रसारित झाले आहेत. इतिहास अभ्यासक संजय बिरार यांचे लेखन अतिशय उत्कृष्ट आहे. त्यांचे नविन पुस्तक लासलगावची बखर प्रकाशनाच्या वाटेवर आहे.अनेक लेख व परमपूज्य भगरी बाबांवर त्यांनी माहिती संकलित केली आहे. तसेच प्रा.किशोर गोसावी यांनी देखील लासलगावचे आराध्यदैवत परमपूज्य भगरी बाबा दिव्यदर्शन या पुस्तकाचे लेखन केलेल आहे. 
नवोदित लेखक शिवाजी विसपुते यांच्या विधिलिखीत या कादंबरीने देखील अनेक पुरस्कार मिळविले आहेत. नुकताच त्यांच्या या कादंबरीला समृद्धी प्रकाशन संस्था हिंगोलीच्या वतीने दिला जाणारा 'राज्यस्तरीय संत नामदेव कादंबरी साहित्य पुरस्कार 2019' मिळाला आहे.झी युवा सिंगर एक नंबर फेम गायक विंचुर येथील  जगदिश चव्हाण हा लासलगाव शिक्षण सहायक मंडळ संचलित लोकनेते दत्ताजी पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी आहे.संगीत व गीत गायनात सुवर्णा क्षिरसागर यांनी अनेक विद्यार्थी घडविले आहेत.नुकताच त्यांचा डिडी सह्याद्री या शासकीय वाहिनीवर संगिताचा कार्यक्रम प्रसारित झाला आहे.मराठी संगीत क्षेत्रात ग्रामिण भागात त्यांचे मोठे योगदान आहे.संगितकार बाबासाहेब चव्हाणके यांचे विद्यार्थी देखील मराठी गीतगायनात राष्ट्रिय स्तरावर चमकले आहेत.महेंद्र फुलपगार, तुषार देवरे असे अनेक नामवंत कलाकार ग्रामिण शहरी भागात मराठी भाषा,मराठी संगीत,गीतगायन यात आपले योगदान देत आहे.ते नक्कीच प्रेरणादाई आहे.अरुण भांबारे यांचे इतिहासा वरील लेख वाचनीय व माहितीपुर्न असतात.त्यांची लेखन शैली अतिशय प्रभावी आहे.कवी राजेंद्र  होळकर यांचे देखील साहित्य क्षेत्रात व मराठी भाषा संवर्धनासाठी खुप मोठे योगदान आहे.लासलगाव समाचार या फेसबुक ग्रुपच्या माध्यमातुन ते नवोदित लेखक, कवी यांचे लेख व कविता यांना नेहमीच प्रसिद्धी देत असतात.शेतीतज्ञ सचिन होळकर यांचे शेतीविषयक मार्गदर्शनपर लेख अनेक वृत्तपत्रे व मासिके यात प्रकाशित झाले आहे.पत्रकार रामभाऊ आवारे,समीर पठाण,निलेश देसाई व अन्य सर्वच पत्रकार यांचे अनेक विषाावरील नाविन्यपुर्न लेख प्रकाशित झालेले आहेत.  ऋषीकेश जोशी गुरू यांचे आपले सण आपले उत्सव व इतिहासपर लेख माहितीपुर्न व मार्गदर्शन करनारे असतात.ब्राम्हण समाजाच्या राज्य कार्याध्यक्षा स्मिता कुलकर्णी यांचे स्त्री सक्षमीकरणावरील लेख मार्गदर्शक असतात.कवी शिक्षक कैलास भामरे,नुमान शेख,गुरुदेव गांगुर्डे यांच्या कविता महाराष्ट्र राज्य साहित्य संमेलनात सादर झालेल्या आहेत.त्यांचे मार्गदर्शनाने अनेक विद्यार्थी कविता लेखन करत आहे.अशा प्रकारे लासलगाव परिसरातील विविध व्यक्तींचे मराठी भाषा संवर्धनासाठी अतोनात प्रयत्न सुरू आहेत.मराठी राजभाषा दिनाच्या आपण सर्व वाचकांना हार्दिक  शुभेच्छा.लेखन व वाचन संस्कृती जोपासण्यासाठी कटिबद्घ राहुया.

समीर देवडे 
उपशिक्षक जिजामाता प्राथमिक शाळा,लासलगाव

Sunday, 12 January 2020

AINET 2020 PAPER PRESENTATION SAMEER DEODE

5th AINET International Conference Hyderabad

5th AINET International Conference
Dates : 10 - 11 January 2020
Venue :Vasavi College of Engineering (Autonomous), Ibrahim Bagh, Hyderabad, Telangana
Conference Theme:- 
English in Multilingual Contexts
Conference  Focus:
AINET International Conference, the theme is English in Multilingual Contexts. It focuses on Curriculums and Syllabuses, Teaching Language Skills, Learner Strategies/Styles, Teacher Training/ Development, Materials/ Coursebooks, Testing and Evaluation, Methods and Approaches and etc.

 Areas
Curriculums and Syllabuses
Teaching Language Skills Learner Strategies/Styles
Teacher Training/ Development
Materials/ Coursebooks
Testing and Evaluation
Methods and Approaches
Psychology of Learners/ Learning
Learner/ Teacher Motivation
History of ELE in India Technology in ELE
Teaching of English Literature ELE Policies in India and Asia
English as Medium of Instruction
---------------------------------------------
Speakers/Presenters at the Conference

Maria Snarski, RELO, American Embassy, Delhi
Jason Anderson, UK
Mark Levy, Spain
Geetha Durairajan, EFLU
Rubina Khan, University of Dhaka, Bangladesh
Vicki Hale, USA
Eileen Finn, USA
Mahananda Pathak, EFLU
    Ravinarayan Chakrakodi, RIESI
    Kshema Jose, EFLU
    Ruth Hauzel, GITAM
    Sunita Mishra, University of Hyderabad
    Priya Iyer, British Council
    Michelle Bambawale, British Council
    Sujata Bhonsale, British Council
    Ashlesha Dsouza, British Council
    J. Appa Swamy, University of Hyderabad
    Mala Palani, Bangalore
    Kuheli Mukerjee, Kolkata
    Vikram Adsul, Maharashtra
    M. S. Xavier Pradeep Singh, Tamilnadu
-----------------------------------------------
Ainet 
Day 1
Today was a very exciting day, so all the new persons, teachers and educators,authors from many countries from all over  the world and multilingual India had gathered at one place.
 Inaugural Session : Dr. E. Suresh Kumar, Voice Chancellor of English and Foreign Languages University Hyderabad inaugurated the conference. He spoke on advantages of multilingualism in cognitive development as well as communicative competencies.
Res.Amol Padwad Sir - It was really a great experience to hear him lively.Mr.Ranjeet Deshmukh Sir (RAA Aurangabad) and many dignitaries were present at the moment.
Opening plenary By - Mark Levy from Spain.
Sub - English in Multilingual Contexts : Lessons and Reflections from Spain
It was very helpful session for all of us to understand the importance of reflection in our teaching.
Poster and paper presentation were inaugurated.   Different topics were chosen by teachers for poster presention. Like motivation to teachers, Use of puppets, Different teaching methods, Grammar etc. Many  primary ZP teachers from our Maharashtra took part in poster and paper presentation in fantastic way. The way they spoke English in the conference while presenting was  admired by friend dignitaries. "How confident the teacher are!" Got such feedback. So many teachers talked about the role of Spoken English training and Tejas Project, Mooc etc in their language development. "All credit goes to RAA Aurangabad and DIETs  from all over Maharashtra." We all firmly reflected this in the conference.
 Even teachers from other states took information about these  projects which are running in Maharashtra like Spoken English, TEJAS, Chess, MOOC spoken English, English language kit etc. and they are going to  demand the same from their governments. It's really honour for our Government and authorities.
I met lots of friends from all over India as well as from other countries. Some of them were my old friends. 
I also got the opportunity to attend different paper presentation, Which are really helpful for us.
 After this, the young old lady Geetha  Durairajan discusses the book written by her and Mr.Amol Pawad Sir and published by the University of Cambridge. I purchased all four books.
British Council distributed  books  of Tejas Success Stories. showing the result of the Tejas initiative in Maharashtra.Its  proud feeling moment for me,that my tejas success story has been published in this book.So many educators took photos with this book and me.They have taken my interview , how I use ICT in my classroom.
Last session was on Teachers Zara Hatke.
An hour with special Teachers
1)Vikram Adsul 
Primary teacher , Recipient of two National Teacher Awards. ZP School Bandgarvasthi ,Ahemadnagar Maharshtra.
2) Sadeqa Ghazal.
Jagjivan College , Magadh University Bihar.
Her passion for social justice she started a women's movement  Women of colour.
3) Akansha Saxena
Teacher with basic education Department Gautam Budha Nagar UP.She has shown exemplary leadership and motivation to lead initiatives like English learning clubs for teachers and students.
4) Nadeem Khan
Secondary Teacher  from Bhandara , Maharashtra
Weras Many other hat's - a wildlife enthusiast, photographer ,tech geek , journalist . Working in CHESS and Tejas project Member of BOS. 
The session lead by Mr.Amol Padwad Sir .
Very useful session to know something more about our profession,We are not only teachers. We can do much more for our students.
Really a joyful day!

AINET
Day - 2
The English International Conference concluded in a very enthusiastic atmosphere
Mumbai's team Sandeep Pawar and Deepak explained in action in an innovative way that many of the innovative aspects of English language studies are understood.After this
Papers presentation started.I presented paper on Development of language Skills. Mr.Janson Anderson, British Council Members ,Mr.Ranjeet Deshmukh Sir From RAA Aurangabad and Nashik team members  attended my presentation.Really a great experience for me to prsent paper.Recieved so many apriaciartion comments from all of them.Special thanks to Harshal Chavan who done arrangement of laptop. And Javeed Karbhari ,Lilke sir who have done video and photo shoot.After this i attend Vikram Adsul Sir's workshop on using action songs in English language teaching.Its very fantastic session.Got opportunity to express  my views on tejas project's impact on Maharashtra primary teacher's. Function of Active Teacher Maharashtra whatsapp forum run Bye Mr.Vikarm Adsul sir. More than ten thousand teacher connected with this,to share their classroom activities.
In pannel discussion Priyamvada Agarwal Mam explained how to use literature while teaching English language.information about  teachers and action research.
In the next panel discussion Rubina Khan Mam from Bangladesh, Qureli Mukherjee from Nepal, Dharmendra Sir from Nepal taken active part in discussion. communicative English teacher from Gujarat, held a question-and-answer session at the end.
Closing plenary by 
Jason Anderson Sir presented research results on The effective English teacher : Perceptions and opinions if Indian teachers.
The humility of Shri Amol Padavad Sir, Secretary of AINET,Mr.Nadeem Kahn sir realised by all of us. 
Thanks to all the faculties and students who served at Vasavi College of Engineering Hyderabad. Special thanks to education authorities Mrs.M.Buvaneshwari Madam CO ZP NAshik., Mrs.Vaishali Zankar Mam. Education officer ZP Nashik.
Mr.Yogesh Sonawane Sir HOD English department Diet Nashik.Mr.Ashok Chavhan Sir State Academic resource person, for their kind co operation and valuable guidance.

Usefull Link
https://www.youtube.com/watch?v=wEAqbln_m3s

Regards.
Mr.Sameer Deode  (Writer – My Spoken English Book)
Tag CO .Teajas project Nashik
Ass.Teacher
Jijamata Prathmik Shala, Lsalagaon Tal - Nipahd ,  Dist – Nashik