Monday, 11 November 2019

CHILDRENS DAY 14 NOV.2019











जवाहरलाल मोतीलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते होते. ते पंडित नेहरू चाचा नेहरू या नावांनीही ओळखले जातात. नेहरूजींचा जन्मदिन 14 नोव्हेंबर बाल दिवसम्हणुन साजरा केल्या जातो. कारण पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुलं फार आवडायची. बालकांचे 'चाचा नेहरू'
श्री जवाहरलाल नेहरू यांचा जन्म अलाहाबाद येथे काश्मिरी पंडितांच्या घरी नोव्हेंबर १४, इ.स. १८८९ रोजी झाला. फेब्रुवारी ७, इ.स. १९१६ रोजी वयाच्या २६ व्या वर्षी त्यांचा विवाह कमला कौल यांच्याशी झाला. इ.स. १९१७ साली त्यांना इंदिरा प्रियदर्शिनी ही कन्या झाली. जवाहरलाल नेहरू यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच खाजगी शिकवण्यांद्वारे झाले. वयाच्या १५ व्या वर्षी ते इंग्लंडला आणि त्यानंतर दोन वर्षे ते हॅरो येथे शिक्षणाकरिता गेले. कॅम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी सामान्य विज्ञान (नॅचरल सायन्स) या विषयात पदवी घेतली. ते १९१२ साली भारतात परतले आणि सरळ राजकारणात उतरले. पंडित जवाहर लाल नेहरू एक असे राजनेता होते ज्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव प्रत्येकाच्या जीवनावर पाडला आहे. इतकेच नाही तर ते एक समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकतांत्रिक गणतंत्राचे गणितज्ञ देखील मानले जातात.
पंडित जवाहरलाल नेहरू Jawaharlal Nehru उर्फ चाचा नेहरू Chacha Nehru यांनी आपल्या जीवनात कधीही हार मानली नाही. ते सतत भारताला स्वातंत्र्य मिळवुन देण्याकरता इंग्रजांशी लढत राहीले. एक यशस्वी आणि पराक्रमी नेता अशी त्यांची सर्वत्र ख्याती पसरली. ते नेहमी गांधीजींच्या आदर्शांवर चालत राहिले.
पंडित जवाहरलाल नेहरू उर्फ चाचा नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. दिल्लीतील तीन मूर्ती भवन या सरकारी निवास स्थानात ते रहात होते. तीन मूर्ती भवन प्रशस्त होते. भवन परिसरात भव्य बगीचा होता. त्यात विविध फुलझाडी होती. चाचा नेहरू यांना फुले फार आवडत होती.

एके दिवशी नेहरूजी बगीचात हिंडताना खूप खूश झाले. पुढे गेल्यानंतर त्यांना एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. आवाजाच्या दिशेने नेहरूजी गेले असता एक- दोन महिन्याचे मुल त्यांना रडताना दिसले.

पढे रंगीबिरंगी फुग्यांनी पंडिजींचे लक्ष वेधले. त्यांना गाडी थांबवायला सांगितली. ते गाडीतून उतरले व फुगे खरेदी करण्यासाठी फुग्यावाल्याकडे गेले. त्यांना फुगे खरेदी करताना पाहून सगळे आश्चर्यचकीत झाले. नेहरूजींनी फुगे उपस्थित मुलांना वाटून दिले.Description: https://marathi.webdunia.com/img/cm/quote_close.gif

नेहरूजी त्या बालकाच्या आईचा शोध घेतला परंतु बगीचात ती दिसली नाही. कोणीच नव्हते. नंतर ते बालक जरा जास्तच रडू लागले. नेहरूजींनी त्याला घेतले. ते बाळ नंतर शांत झाले. नंतर ते चाचा नेहरूंकडे पाहून हसू लागले. तितक्यात त्या बालकाची आई धावत आली. नेहरूजी हातात आपले बाळ हसताना पाहून तिला आश्चर्य वाटले. नंतर नेहरूजींनी बालकाला त्याच्या आईकडे सोपविले.
एकदा पंडितजी तमिळनाडूच्या दौर्‍यावर गेले होते. चाचा नेहरूंना पाहण्यासाठी तेथील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. काही नागरिकतर सायकलीवर उभे राहून त्यांना बघत होते. जागा भेटेल तेथून प्रत्येक जण पंडिजींना बघत होता.

पढे गेल्यानंतर हवेत उडणार्‍या रंगीबिरंगी फुग्यांनी पंडिजींचे लक्ष वेधले. त्यांना गाडी थांबवायला सांगितली. ते गाडीतून उतरले व फुगे खरेदी करण्यासाठी फुग्यावाल्याकडे गेले. त्यांना फुगे खरेदी करताना पाहून सगळे आश्चर्यचकीत झाले. नेहरूजींनी खरेदी केलेले फुगे उपस्थित सगळ्यांना वाटून दिले. चाचा नेहरूंचे मुलांवर खूप प्रेम होते. 'मुले म्हणजे देवा घरची फुले' असं ते नेहमी म्हणत असत. मुलेही त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणत होते.
आत्मकथा (मूळ इंग्रजी, मराठी अनुवाद - ना.ग. गोरे)
इंदिरेस पत्रे (मूळ इंग्रजी- Letters from a Father to His Daughter; मराठी अनुवाद - वि. ल. बोडस)
भारताचा शोध (मूळ इंग्रजी -Discovery of India, मराठी अनुवाद - साने गुरुजी
पुरस्कार: भारतरत्न (1955)

No comments:

Post a Comment