Wednesday, 2 October 2019

महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्ताने.2/10/2019

 Pls read article written by me
 
https://www.jagrutmaharashtra.com/article/महात्मा-गांधी-यांचे-शिक्षण-क्षेत्रातील-योगदान

महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्ताने.. ...

Tuesday, 24 September 2019

JIAJAMATA PRAIAMRY STUDENTS WATCHING SHORTFILM IN THEATER 21/09/2019






#जिजामाता_प्राथमिक_शाळेतील विद्यार्थ्यांनी पाहिला #सिनेमागृहामध्ये_भगरीबाबांचा_लघुपट.
लासलगाव शिक्षण सहायक मंडळ संचलित आय.एस.ओ.मानांकित जिजामाता प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने आज दि.21/09/2019 रोजी सहशालेय व दप्तरमुक्त शनिवार अंतर्गत लासलगावचे ग्रामदैवत परमपुज्य संत भगरीबाबा यांच्या जीवनावर आधारीत लघुपट दाखविन्यात आला. संस्थेचे सचिव संजय पाटील यांचे सहकार्याने कमलाकर सिनेमागृह येथे मोफत हा लघुपट दाखविन्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक श्री.अनिस काझी यांनी केले.ग्रामदैवत भगरीबाबा व संस्थेचे संस्थापक लोकनेते दत्ताजी पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन लघुपटाचे दिगदर्शक राहुल बनकर ,छायाचित्रकार सुदर्शन हिरे,गौरव भोयटे व उपस्थित शिक्षक वृंद यांचे शुभहस्ते संपन्न झाले.मनोगत व्यक्त करतांना राहुल बनकर यांनी भगरीबाबा भक्त परिवाराचा लघुपट निर्मितीचा
उद्धेश स्पष्ट केला.तसेच स्थानिक कलाकारांचा वापर करून,छायाचित्रणांचे ठिकाणे याविषयी माहिती सांगितली.प्राथमिक शाळेची इयत्ता चौथीची विद्यार्थीनी आर्या भोयटे हिने बाल कलाकार म्हनुन लघुपटात भुमिका केली आहे.तिचे मान्यवरांचे हस्ते अभिनंदन करन्यात आले.सर्व विद्यार्थ्यांनी सिनेमागृहातील खुर्च्यांवर बसुन सिनेमा पाहन्याचा मनमुराद आनंद लुटला. कार्यक्रमाचे सुत्र संचलन समीर देवडे यांनी केले